Akshargranth
Zapatlela Shiledar by Vijay Padalkar
Zapatlela Shiledar by Vijay Padalkar
Couldn't load pickup availability
Zapatlela Shiledar by Vijay Padalkar
ही मिगेल द सर्वान्तीसची कादंबरी वाचताना मला अकस्मात जाणवले, की मी म्हणजे डॉन आणि सांचो याचे मिश्रणच आहे. माझ्या मनात असंख्य स्वप्ने भिरभिरत असतात, अनेक भ्रमांच्या मागे मी ओढला जातो, कल्पनेच्या राज्यात गुंग होण्याची सवय अजून गेलेली नाही, स्वप्ने पाहण्याचे मी थांबवीत नाही, कारण ती थांबविणे माझ्या हाती नसतेच. दुसरीकडे सांचोप्रमाणे माझी धाव कुठपर्यंत आहे हे मी जाणतो, माझी सुस्थिर जीवनाची ओढ मला सीमेपलीकडे जाऊ देत नाही, वेडे होऊ देत नाही
आणि मग माझ्या ध्यानात आले की, प्रत्येक माणसातच या दोघांचे मिश्रण आहे. माणसामाणसांत फरक असतो तो या मिश्रणातील प्रमाणामुळे, ज्यांच्यात डॉनचे प्रमाण अधिक ते कलावंत, कवी, दृष्टे किंवा वेडे बनतात; ज्यांच्यात सांचो अधिक प्रमाणात असतो ते व्यवहारी बनतात, चिवटपणे जगतात, निमूटपणे मरतात पण जगताना कधीकधी एखाद्या डॉनलाही जगवतात...
Share
