Collection: Madhuri Purandare

Madhuri Purandare Books All Collection buy at Akshargranth website | माधुरी पुरंदरे यांनी मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून जीडी आर्टचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पॅरिस येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्ट यांचे शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठातून त्यांनी फ्रेंच भाषेचा डिप्लोमाही केला. पुढे नेक र्षे त्यांनी अलीओंस फ्रांसेज संस्थेमध्ये फ्रेंच भाषा शिकवण्याचे कार्य केले. वाचू आनंदे या पुस्तक-संचातून चांगल्या मराठी साहित्यातील निवडक वेच्यांची आणि त्या आधारे देशभरातील नामवंत चित्रकारांच्या चित्रांची आणि विविध चित्रशैलींची त्यांनी ओळख करून दिली. 

मुलांना भाषाभ्यासाची गोडी लागावी, त्यांची व्याकरणाची जाण वाढावी या हेतूने लिहिलेला लिहावे नेटके हा पुस्तक-संच मुलांसाठीच नव्हे, तर मोठ्यांसाठीही भाषेचा अभूतपूर्व मार्गदर्शक ठरला.